World Day Special >> Brief list of 19th July📚🖋️📚

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात.

या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.

जुलै १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०० वा किंवा लीप वर्षात २०१ वा दिवस असतो.

सोळावे शतक 

• १५५३ – मेरी पहिली इंग्लंडच्या राणीपदी.

सतरावे शतक 

• १६९२ – अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.

एकोणिसावे शतक

• १८७० – फ्रांसने प्रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

विसावे शतक

• १९१२ – अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.

• १९४० – दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.

• १९४७ – म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑॅंग सान व ६ मंत्र्यांची हत्या.

• १९६३ – ज्यो वॉकरने त्याचे एक्स १५ प्रकारचे प्रायोगिक विमान १,०६,०१० मीटर (३,४७,८०० फूट) उंचीवर नेले.

• १९६७ – पीडमांट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.

• १९७६ – नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.

• १९७९ – निकाराग्वात उठाव.

• १९८५ – ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.

• १९८९ – युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.

एकविसावे शतक

जन्म

• १८१४ – सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.

• १८३४ – एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.

• १८७६ – जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

• १८७७ – आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

• १८९४ – ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.

• १८९६ – ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.

• १९३४ – फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.

• १९३८ – डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.

• १९४६ – इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.

• १९५५ – रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

• ५१४ – पोप सिमाकस.

• ९३१ – उडा, जपानी सम्राट.

• १९४७ – आंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.

• १९६५ – सिंगमन ऱ्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

• १९८० – निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.

• २००४ – झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.

कोणता देश त्या दिवशी काय पालन करतात

• शहीद दिन – म्यानमार.

• राष्ट्रीय मुक्ती दिन – निकाराग्वा.

• राष्ट्राध्यक्ष दिन – बॉत्स्वाना.

महत्वाच्या घटना

१६९२ अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली

१८३२ सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली . 

१९०० पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली ) 

१९०३ मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली 

१९४० दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई  

१९४७ म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली 

१९५२ फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात 

१९६९ भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले 

१९६९ नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले 

१९७६ नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली 

१९८० मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली 

१९९२ कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर .

जन्म 

१८१४ : अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म

१८२७ : क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म ( मृत्यू : ८ एप्रिल १८५७ 

१८३४ : फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म 

१८९६ : स्कॉटिश लेखक ए . जे . क्रोनिन यांचा जन्म ( मृत्यू ६ जानेवारी १९८२ 

१८ ९९ : भारतीय डॉक्टर , लेखक , कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म ( मृत्यू : ९ फेब्रुवारी १९८९

१९ ०२ : कवी , कोशकार , इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म . ( मृत्यू : ८ फेब्रुवारी १९९ ४ 

१९ ०२ : भारतीय गायक , निर्माता , निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म ( मृत्यू : १६ मार्च १९६८  

१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म ( मृत्यू : २ ९ सप्टेंबर २००४ 

१९३८ : सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ . जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म 

१९ ४६ : रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म 

१९५५ : क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *