जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे पदवीधर अंशकालीन उमेदवारामधून कंत्राटी तत्वावर ८ सहाय्यक व ८ डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्याकरीता जाहिरात शुद्धपत्रक👇👇👇
सहाय्यक व डाटा एंट्री
सर्व साधारण सूचना
उमेदवारांनी अर्ज सादर करीता असतांना कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेवेळी पदाकरीता आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करता येईल . सर्वसाधारण अटी व शर्ती
१. उमेदवार भारताचा नागरीक असावा .
२. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
३. उमेदवार गोंदिया जिल्हाचा रहिवासी असावा .
४. सदर उमेदवांनी रहिवासी असल्याचा सक्षम प्राधिका – याचा विहित नमुण्यातील दाखला कागदपत्र तपासणीचे वेळी सादर करणे अनिवार्य राहिल .
५. अधिवास ( Domecial ) प्रमाणपत्र आवश्यक .
६. निवड प्रकिय सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्ती नंतर किंवा नियुक्ती नंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांनी दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्त बाद करण्यात येईल , व शासनाची दिशाभुल केल्या प्रकरणी सदर उमेदवारा विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल .
७. चारित्र्य – पुर्वचारित्र्य पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधीत उमेदवार नियुक्तीसाठी / सेवेसाठी पात्र राहणार नाही तसेच कोणत्याही टप्प्यावर असे उमेदवार अपात्र ठरतील .
८. निवड झालेल्या उमेदवाराचे वैद्यकिय तपासणी करण्यात येईल वैद्यकिय अहवाल प्रतीकुल असल्यास केलेली निवड व नेमणुक रदद करण्यात येईल .
९ . सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुबई ४०००३२ दिनांक २८ मार्च २००५ अधिसुचना अन्वये लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल ( लहान कुंटुंबाचे प्रमाणपत्र नमूना अ )
१०. अंशकालीन पदवीधर उमेदवार असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल .
११. वरील पदे पुर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ११ महिण्याकरीता आहे . नियुक्ती केलेला उमेदवारास शासनाचे आस्थापनेवर हक्क प्रस्तापीत करता येणार नाही
१२. नियुक्ती उमेदवारांनी कामाचे स्वरुपात काम न केल्यास कोणतेही कारण न देता कामावरुन कमी करण्यात येईल .
१३. आवश्यक संपुर्ण कार्यवाही झाल्यानंतरच नियुक्ती आदेश देण्यात येईल .
१४. नियुक्ती केलेल्या कर्मचा – यांना नियमित आस्थापनेवरील शासकीय कर्मचा – यांना अनुज्ञेय असणारे शासकीय सेवेचे इतर अनुषंगीक कोणतेही लाभ व भत्ते मिळणार नाही .
१५. सदर भरती प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचे संपुर्ण अधिकार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे राखुन ठेवण्यात येत आहे .
१६. वरील अटी व शर्ती नियमाव्यतीरीक्त शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व निर्णय लागू राहील .
सहाय्यक व डाटा एंट्री
वयोमर्यादा :
१ ) उमेदवराने अर्ज सादर करण्याचा अंतीम दिनांकास अर्ज केलेल्या पदाकरीता विहित वयोमर्यादा आणि आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक राहील .
२ ) अर्ज सादर करण्याचे अंतीम दिनांकास खुल्या व सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवाराचे वय २५ वर्ष पेक्षा कमी नसावे .
३ ) अर्ज सादर करण्याचे अंतीम दिनांकास खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे .
👆👆संपूर्ण माहिती👆👆