महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022|| 228 जागा

महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण २२८ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२२ , शनिवार , दिनांक ०५ नोव्हेंबर , २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल : २ .

प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

 

५.७ विमुक्त जाती ( अ ) , भटक्या जमाती

 ( ब ) , भटक्या जमाती

( क ) व भटक्या जमाती

 ( ड ) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल .

५.८ एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात / जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील 

 

५.९ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एसआरव्ही -१०१२ / प्र.क्र .१६ / १२ / १६ – अ . दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक संकीर्ण -१११८ / प्र.क्र .३ ९ / १६ – अ , दिनांक १ ९ डिसेंबर , २०१८ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल 

 

५.१० आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील ( ईडब्लूएस ) उमेदवारांकरीता शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक : राआधो -४०१९ / प्र.क्र .३१ / १६ – अ दिनांक १२ फेब्रुवारी , २०१९ व दिनांक ३१ मे , २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील .

महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

५.११ अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे 

 

५.१२ सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव ( खुला ) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल . याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .

५.१३ अराखीव ( खुला ) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पुर्तता करणा – या सर्व उमेदवारांचा ( मागासवर्गीय उमेदवारांसह ) अराखीव ( खुला ) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी , अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे .

५.१४ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणान्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे . सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा १ ९ ५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल .

५.१५ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा ( सामाजिक अथवा समांतर ) अथवा सोयी सवलतींचा दावा करणा – या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वेध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे .

५.१६ सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल .

५.१७ खेळाडू आरक्षण : :महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

५.१७.१ शासन निर्णय , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक : राक्रीधो -२००२ / प्र.क्र .६८ / क्रीयुसे -२ , दिनांक १ जुलै , २०१६ , तसेच शासन शुध्दीपत्रक , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक : राक्रीधो -२००२ / प्र.क्र .६८ / क्रीयुसे -२ , दिनांक १८ ऑगस्ट , २०१६ , शासन निर्णय , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक संकीर्ण १७१६ / प्र.क्र .१८ / क्रीयुसे -२ , दिनांक ३० जून , २०२२ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल .

५.१७.२ प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा – या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका – याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे .

५.१७.३ खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो , याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे . अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही .

५.१७.४ कागदपत्रे पडताळणी / मुलाखतीच्यावेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका – याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो , याविषयीचा सक्षम प्राधिका – याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशी / नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल . ५.१७.५ एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणा – या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे .

दिव्यांग आरक्षण : १.१८.२ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक दिव्यांग २०१८ / प्र.क्र .११४ / १६ अ . दिनांक २९ मे २०१९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षण

५.१८.३ दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील .

५.१८.४ दिव्यांग व्यक्तींची संबंधित संवर्ग / पदाकरीता पात्रता शासनानाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील .

५.१८.५ दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे , याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल .

५.१८.६ संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४० % दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी / सवलतीसाठी पात्र असतील .

५. १८.७ लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार / व्यक्ती खालील सवलतींच्या दाव्यास पात्र असतील : ( १ ) दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० % अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी सवलती ( २ ) दिव्यांगत्याचे प्रमाण किमान ४० % अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय सोयी – सवलती

५.१८.८ दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा – या उमेदवारांनी शासन निर्णय , सार्वजनिक आरोग्य विभाग , क्रमांक अप्रकि- २०१८ / प्र .क्र .४६ / आरोग्य -६ , दिनांक १४ सप्टेंबर , २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीदवारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे .

५.१९.१ अनाथ आरक्षण :

महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

५.९९.१अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासन निर्णय , महिला व बालविकास विभाग , क्रमांक : अनाथ -२०१८ / प्र.क्र .१८२ / का -०३ , दिनांक २३ ऑगस्ट , २०२१ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा – या आदेशानुसार राहील .

५.१९ .२ अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे ; त्या प्रवर्गातून करण्यात येईल .

५.१९ .३ पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांचेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे . तसेच दिनांक २३ ऑगस्ट , २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विहित कालावधीत सादर करणे आवश्यक राहील . अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही .

५.२० माजी सैनिकांकरीता आरक्षण :

महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

५.२०.१ उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे , अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत .

५.२०.२ माजी सैनिकांकरीता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील .

५.२०.३ आवश्यक प्रमाणपत्र :

( १ ) सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र : माजी सैनिकांसाठी असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणा – या उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिका – याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .

( २ ) जात प्रमाणपत्र व नॉन – क्रिमीलेयर प्रमाणपत्र : उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट होत असेल , त्या प्रवर्गासंबंधीचे जात प्रमाणपत्र तसेच वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र ( लागू असल्यास ) सादर करणे आवश्यक आहे .

७.५ शैक्षणिक अर्हता : 

उद्योग निरीक्षक , गट – क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य माणून मान्य केलेली अर्हता .

उद्योग निरीक्षक , गट – क संवर्गाांकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील : ( १ ) सांविधिक विद्यापीठाची , अभियांत्रिकी मधील ( स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका , किया ( २ ) विज्ञानातील सांविधिक विद्यापीठाची पदवी ,

पदविका / पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील . परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज / माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहीन

 

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे .

कर सहायक व लिपिक – टंकलेखक संवर्गासाठी टंकलेखन  अर्हता:-

कर सहायक व लिपिक – टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अहंता असणे आवश्यक आहे .

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज / माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे

अधिक माहिती साठी Slide पहा 👇👇👇

👉👉My 11258 peple viewing this Post 👈👈

👉👉General knowledge BLOG👈👈

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी :

👇अ.क्र . १ तपशील अर्ज सादर करण्याचा कालावधी👇

०१ ऑगस्ट २०२२ रोजी १४.०० ते दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी २३ : ५९

 

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम 👇दिनांक👇

दिनांक २२ ऑगस्ट , २०२२ रोजी २३ : ५९

 

भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क 👇भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक👇

दिनांक २४ ऑगस्ट , २०२२ रोजी २३ : ५९

 

👇 चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक👇

दिनांक २५ ऑगस्ट , २०२२ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

 

स्लाईड 👇👇👇 पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *