BMC MCGM Recruitment 2022 || बृहन्मुंबई महानगरपालिकेत 146 जागा

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव , मुंबई – 22. येथे अधिपरिचारीका यांची फक्त सहा महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने करारनामा सापेक्ष नेमणूक करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे .

र्जाचे शुल्क रुपये 354 / – रोखीत रोखपाल विभाग , कॉलेज बिल्डींग , तळमजला , रुम नं 15 , शीव , मुंबई – 400022 येथे भरण्यात यावे . परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकीत छायांकीत प्रतीसह व अर्जाचे शुल्क भरल्याच्या पावतीसह शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत परिचारिका आस्थापना कक्षात दि 23.11.2022 ते दि 02.12.2022 पर्यंत स्विकारले जातील . दि 02.12.2022 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबतीतील कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार स्विकारला जाणार नाही . कंत्राटी पदांचा तपशील

 

प्रशिक्षित अधिपरीचारिका 

(कंत्राटी तत्वावर)

(सहा महिन्याकरिता)

118

निश्चित ठोक मानधन 

30,000 रू 

प्रशिक्षित अधिपरीचारिका शैक्षणिक अहर्ता

1. उमेदवार 12 वी पास व कमीत कमी परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली GNM ही पदवी धारण केलेली असावी . तरी उच्च गुणवत्ता धारक उमेदवार अर्ज करु शकतात परंतु वेतन रु .30,000 / – च राहील .

2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा , किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे .

• वयोमर्यादा :

1. खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षा पेक्षा अधिक असता कामा नये . अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा .

2. मागासवर्गीय प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षा पेक्षा अधिक असता कामा नये .

अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा .

सर्वसाधारण अटी : 1. उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र , नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे . तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात

 . 2. उमेदवाराने अर्जावर स्वतःचा भमणध्वनी क्रमांक व ई मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे .

अर्ज मिळण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400 002

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, परिचारिका आस्थापना कक्ष, शीव मुंबई, 400 002

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (बधिरिकरणशास्त्र)

शैक्षणिक पात्रता: (i) M.D. (Anaesthesiology) / M.S. (Anaesthesiology) / DNB (Anaesthesiology) (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: ₹580+18% GST

अर्ज मिळण्याचे ठिकाण: मुख्य लिपिक, लो. टी. म. स. रुग्णालय, शीव मुंबई, 400 002

अर्ज मिळण्याचा कालावधी: 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 (11:00 AM ते 03:00 PM)

थेट मुलाखत: 15 डिसेंबर 2022 (11:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण: अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022

लो.टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील बधिरिकरणशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापकांची 28 पदे रिक्त आहेत . तरी मा . अति . आयुक्त ( प.उप. ) यांच्या क्र . AMC / WS / 6735 / D दि .29.04.2022 अन्वयेच्या प्राप्त मंजुरीच्या अनुषंगाने अर्हताप्राप्त उमेदवारांकडून स्थानिक पातळीवर सदर पदे भरण्यात येणार आहेत . इच्छुक उमेदवारांनी अर्जासह अधिष्ठाता , लो.टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय , डॉ . बाबासाहेब आंबेडकर रोड , शीव , मुंबई 400 022 , यांच्या दालनात सोबत जोडण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्यक्ष मुलाखतीकरीता उपस्थित रहावे . उमेदवारांनी मूळप्रमाणपत्रे व झेरॉक्सप्रती मुलाखतीच्या वेळी घेऊन यावीत .

Current तलाठी भरती पोस्ट

Another Famous POST 

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *