४० हजार विविध पदांची भरती होणार – लोकमत 📰🗞️📰🕺💃

 मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची घोषणा करतानाच याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘ अ ‘ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर , मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा , नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी , प्रधान सचिव सोनिया सेठी , मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यावेळी उपस्थित होते .

■ सर्व महानगरपालिका , नगरपरिषद पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पढ़े रिक्त असून, त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध प करण्याच्या सूचना मुख्यमंत्री दिल्या . राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद नगरपंचायत स्तरावरील संवर्गात ‘ क ‘ आणि ‘ ड ‘ गटाची ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे.

त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांत जिल्हा धिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेतील ८४९० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली असून , ती मे अखेर भरती पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले . रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व बाबी पूर्ण करून भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

आई हा शब्द नसून ती माझी भावना आहे.  

माझी आई माझ्या आयुष्य साठी मोठी चालना आहे. 

आई माझी आदर्श कल्पना मूर्ती आहे. 

आई जगातील सर्वोत्तम कीर्ती आहे. 

आईचे मुलांवर प्रेम आश्चर्यकारक स्मुर्ती आहे.

 

कोण जाणते आहे?

आईचे प्रेम अनुभवणारी व्यक्ती स्वतःला भाग्यवान व्यक्ती मानते आहे.  

आईचे प्रेम शब्दांतून कधीच व्यक्त होऊ शकत नाही.  

माझी आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

 

आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती दगडी फोडू शकते.

माझ्या आईचे रूप कधीही नाही बदलू शकते.

आई माझी अंतःकरणात खोलवर जाणवू शकते. 

पाहिजे तसे वरदान प्रत्येक मूल घेऊ शकते.

 

माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे.  

मी या जगात येण्याचे कारण तीच आहे.

आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे.

माझ्या आईचे प्रेम बिनशर्त प्रेम आहे.

माझी आई जन्मजात सेनानी आहे.

 

माझ्या आईच्या शब्दात माया आहे.

आई मृदु मुलायम, जणु काही देवाची काया आहे.

आई पावसाची पहिली धार आहे.

आई देवाच्या गळ्यातला फुलांचा हार आहे.

 

माझ्या डोळ्यातले अश्रु, आईच्या डोळ्यात जमा होतात.

माझे सारे अपराध, आईच्या मिठीत क्षमा होतात.

आईच्या पदराला नेहमी माझा गंध येतो.

अन माझ्या भवती आईला आनंद येतो.

आईचा मायेचा पाझर कुठून येतो.

 

आईच्या प्रेमला तोड नाही.

आईच्या माये एवढी कुठलीच गोष्ट गोड नाही.

माला न समजणार, ती एक कोडं आहे.

माझ्या प्रेमात आईचे मन वेड आहे.

प्रेमाच्या लढाईत देव ही हारून येतो.

 

*आज 12 जानेवारी…*

*राष्ट्रीय युवा दिवस जाणून घ्या इतिहास…*

 

दरवर्षी *12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस* म्हणून साजरी केली जाते. 1984 साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. त्यानंतर 1985 पासून दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जाऊ लागला. 

आधुनिक भारताचे निर्माते स्वामी विकेकानंद याचे जीवन आणि त्यांच्या विचारांमधून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला होता.

 

स्वामी विवेकांनंद यांचे नाव अशा विद्वानांमध्ये घेतले जाते, ज्यांनी मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानला होता. संन्यासी स्वामी विवेकानंद यांचा…

*जन्म 12 जानेवारी 1863* मध्ये बंगालमध्ये झाला होता. स्वामी विवेकानंद आपल्या आवेशपूर्ण आणि तर्कावर आधारित भाषणांमुळे लोकप्रिय झाले. विशेष करुन त्यांची भाषणे आणि विचार तरुणांना भावले.

 

मानवतेच्या सेवेसाठी विवेकानंदानी *1887 मध्ये रामकृष्ण मिशनची* स्थापना केली. या मिशनचे नाव विवेकानंदानी आपले गुरु रामकृष्ण परमहंस याच्या नावावरुन ठेवले होते. भारतीय तरुणांसाठी स्वामी विवेकांनद यांच्यापेक्षा दुसरा मोठा आदर्श नेता क्वचितच असेल. त्यांनी अमेरिकेतील शिकागोमध्ये 1893 मध्ये आयोजित विश्व धर्म महासभेत भारत आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते.

 

स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय सांगून जातो की, 39 वर्षाचा त्यांचा अल्प जीवनकाळात त्यांनी जे केलं त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना ते मार्गदर्शन करत राहतील. 25 व्या वर्षी त्यांनी भगवे कपडे धारण करत संन्यास घेतला होता. पायी चालून त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केलं होतं. त्यांनी अनेक देशांनाही भेट दिली होती.

 

संत, महंत, विचारवंत, क्रांतिकारक यांनी मानव कल्याण आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, तर काहींनी प्राणार्पण केले. मानव कल्याणाचा विचार साऱ्या विश्‍वाला देत हिंदू संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करून देत, मानवी जीवनाला व युवाशक्‍तीला ऊर्जा प्राप्त करून देणारा महान संन्यासी म्हणजे *स्वामी विवेकानंद.*

 

जे जे सकारात्मक आहे ते सर्व स्वामी विवेकानंदांच्या विचारात आहे, असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात.

 

*11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेचा* दिवस उजाडला. यात प्रत्येक धर्माचे धर्मगुरू व चार ते पाच हजार नागरिकही उपस्थित होते. कार्डिनल गिरबन्स हे या धर्म महासभेचे अध्यक्ष होते. प्रत्येक धर्माचे धर्मपंडित आपला धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगत होते. परंतु जेव्हा विवेकानंद उभे राहिले आणि…

*’माझ्या अमेरिकेतील बंधू-भगिनींनो’* हे वाक्‍य उचारताच साऱ्या सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. हिंदू संस्कृतीचे, सभ्यतेचे, सर्वसामावेशकता व सहिष्णुतेचे दर्शन साऱ्या जगाला झाले. त्यांनी हिंदुधर्मावरील परिपूर्ण असे भाष्य केले. त्यांचे चैतन्यपूर्ण व ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. 17 दिवस ही धर्मपरिषद चालली होती.

 

अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, तुम्ही ज्या आदर आणि प्रेमाने माझं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय उंचबळून आलं आहे. जगातली सर्वांत जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची भूमी असलेल्या भारत मातेतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व जाती आणि संप्रदायाच्या लाखो-करोडो लोकांतर्फे मी तुमचे आभार मानतो, असे म्हणून विवेकानंद म्हणतात.

 

‘आम्ही केवळ सर्व धर्माचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाहीत तर सर्व धर्मांचा सत्याच्याच रूपात स्वीकार करतो. मी त्या देशात राहतो की ज्या देशाने अन्य ठिकाणी रंजल्यागांजलेल्या लोकांना शरण दिली आहे. भारतभूमी ही आश्रय देणारी तर आहे व त्यांना आपलेसे करणारी आहे. विवेकानंद आपल्या भाषणात भगवद्‌गीतेतील श्‍लोक सांगतात, ज्याप्रमाणे नद्यांची उगमस्थाने वेगवेगळी असून त्या वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सागरास मिळतात. त्याचप्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो. हे पंथ भलेही वेगळे असो पण ते सर्व ईश्‍वरापर्यंत पोहोचवतात हा माझा विश्‍वास आहे. यातून सर्वधर्म समभाव ही शिकवण मिळते.

 

पुढे विवेकानंद सांगतात, सांप्रदायिकता, कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाने गेल्या अनेक वर्षांपासून या वसुंधरेला आपल्या पाशात अडकवून ठेवून धर्माच्या नावावर हिंसा केली. अनेक चांगल्या संस्कृती व देश नाहीसे झाले. कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाविरोधात या सभेने रणशिंग फुंकले आहे. त्यावेळी साम्राज्यवाद अनेक देशांत फोफावला होता. अनेक देश पारतंत्र्यात होते, तर आधुनिकीकरणाची सुरुवातही होत होती. अशा वेळी विवेकानंदांचे भाषण जगाला प्रेरणा व अनेक देशभक्‍तांना ऊर्जा देऊन गेले. विवेकानंदांनी शिकागो परिषदेत आपल्या ओजस्वी वाणीतून जगाला हिंदू संस्कृतीची ओळखच नव्हे तर व्याप्तीही दाखवून दिली. त्यांनी आपल्या भाषणातून एकूण नऊ मुद्दे मांडले. यातून त्यांनी विश्‍वबंधुत्व, स्वातंत्र्य, समता, सहिष्णुतेची महती जगाला सांगितली.

 

विवेकानंदांच्या विचाराचा साऱ्या जगावर प्रभाव पडला. सारे जग त्यांना आपले मानू लागले. खऱ्या अर्थाने लोकांनी त्यांना *विश्वरत्न* मान्य केले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी व त्यांना भेटण्यासाठी जग आतुर झाले होते. विचार ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाने नवा संकल्प घेऊन विवेकानंदांचे विचार जगा पुढे मांडले. हेच युवाशक्‍तीची प्रेरणा व ऊर्जास्रोत आहे. तो विचार आजच्या युवा पिढीने अवलंबला पाहिजे, तरच नैराश्‍य जाऊन एक चैतन्य निर्माण होईल.

 

स्वामी विवेकानंदांना अष्टपैलू म्हणतात. विवेकानंदांना धर्म, तत्वज्ञान, इतिहास, कला, सामाजिक शास्त्र, साहित्य यांचे ज्ञान होते. शिक्षणात पारंगत असण्यासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते.

 

*मूर्तिपूजेचे औचित्य…*

 

अल्वरचे दिवाण राजा मंगल सिंग यांनी 1891 मध्ये विवेकानंदांना भेटण्यासाठी आमंत्रित केले. मंगल सिंह यांनी विवेकानंदांना सांगितले की, “स्वामीजी, हे सर्व लोक मूर्तीची पूजा करतात. माझा मूर्तीपूजेवर विश्वास नाही. माझे काय होईल?” प्रथम स्वामीजी म्हणाले की “प्रत्येकाला त्यांचा विश्वासाच्या शुभेच्छा.” मग काहीतरी विचार करून स्वामीजींनी राजाचे चित्र आणायला सांगितले. राजाचे तैलचित्र भिंतीवरून खाली आणल्यावर स्वामीजींनी दिवाणांना त्या चित्रावर थुंकण्यास सांगितले. दिवाण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. तेव्हा स्वामीजी म्हणाले की हा फक्त कागदाचा तुकडा आहे, तरीही तुम्हाला त्यात संकोच वाटत आहे कारण तुम्हा सर्वांना माहित आहे की ते तुमच्या राजाचे प्रतीक आहे? स्वामीजी राजाला म्हणाले, “तुम्हाला माहित आहे की हे फक्त चित्र आहे, तरीही तुम्ही त्यावर थुंकल्यास तुमचा अपमान होईल. लाकूड, माती आणि दगडापासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करणार्‍यांना हेच लागू होते. ते या धातूंची पूजा करत नाहीत तर त्यांच्या देवाचे प्रतीक आहेत.

 

धर्म संकल्पनेत त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन होता. तो साऱ्या जगाने स्वीकारला. जगाला दीन, दुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. ईश्‍वर प्रत्येक प्राणीमात्रात आहे, असे सांगणारे युगनायक, युगपुरुष, तपस्वी, संन्यासी, निस्सीम देशभक्‍त अखेर कोलकत्ता शहरातील *बेलूर मठात 4 जुलै 1904 रोजी समाधिस्त झाले.

मागील भरती 

मागील भरती 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *