प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
👉👉 मुळ जाहिरात डाऊनलोड करा 👈👈
– शुद्धिपत्रक :
👇👇👇
अशा प्रकारे _विषय : – जाहिरात क्रमांक ५३/२०२२ , दिनांक २३ जून , २०२२ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ च्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
१. विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही , तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक २४ जुलै , २०२२ रोजी २३ :५८वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
२. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक २५ जुलै , २०२२ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे . विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही , तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
दिनांक २३ जून , २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
सहसचिव ,
जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ८०० पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ , शनिवार , दिनांक ०८ ऑक्टोबर , २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल :प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा
रिक्त पदांचे नाव आणि पदसंख्या :
1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
शारीरिक मोजमापे/अर्हता :
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे
पुरुष
उंची – १६५ सें मी
छाती न फुगविता : ७९ सें
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें मीमी ::
महिला : १५७ सें मी
परीक्षा फी :
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा
संवर्गातील पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे .
पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल .
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल .
पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील .
प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे (महिला, दिव्यांग व्यक्ती, खेळाडू, अनाथ ) उपलब्ध नाहीत,
तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करंपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता पद उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल / वाढ होण्याची शक्यता आहे .
सदर बदललेली पदसंख्या अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त संवर्गातील पदे पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा
यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टण्यावर विचारात घेतली जाणार नाही
महिला खेळाडू तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील .
महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच नॉन क्रीमीलेअर मध्ये मोडत असल्याबाबत ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून ) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे .
विमुक्त जाती (A), भटक्या जमाती (B),भटक्या जमाती (C) व भटक्या जमाती (D) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल .
अर्ज करताना एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसंच सक्षम प्राधिकान्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात /जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील ,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा
समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक एसआरव्ही -२०१२ / प्र.क्र .१६ / १२ / १६ – अ , दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण -१९१८/ प्र.क्र .३९ / १६ – अ दिनांक १९ डिसेंबर , २०१८ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल .
आर्थिक दुर्बल घटकांतील ( ईडब्लूएस ) उमेदवाराकरीता शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक : राआधी -४०१ ९ / प्र.क्र .३१ / १६ – अ . दिनांक १२ फेब्रुवारी , २०१९ व दिनांक ३१ मे , २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील .
अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादिमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव ( खुला ) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.
याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .
अराखीव ( खुला ) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसंच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणा-या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह)
अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी ,
अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवगांसंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा MPSC ANOTHER POST👈👈👈